Ad will apear here
Next
बाळंतपणानंतर येणाऱ्या लठ्ठपणावर मोफत मार्गदर्शन
रत्नागिरी : बाळंतपणानंतर येणाऱ्या लठ्ठपणावर आहारातून उपाय सांगण्यासाठी नाशिक येथील प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट नितीन दाढे यांचे मोफत मार्गदर्शन येथील ट्रिनिटी हेल्थ ग्रुप आणि वीरश्री ट्रस्ट यांनी आयोजित केले आहे. हा कार्यक्रम १० जून रोजी मारुती मंदिर येथील महिला मंडळ सभागृहात सायंकाळी चार ते पाच या वेळेत होईल.

गेल्या काही वर्षांपासून आपल्या राहणीमानात मोठ्याप्रमाणात बदल झाला आहे. कष्टाच्या कामांची जागा मशिनने घेतली आहे. नोकरदार महिलांची बहुतांश कामे बैठी असल्याने महिलांमधील लठ्ठपणा वाढत जात आहे. त्यातच बाळंतपणानंतर लठ्ठपणात वाढ होण्याचे प्रमाण वाढत जात असून, महिलांसमोर ही मोठी समस्या आहे. अशावेळी जिम, योगा, झुंबा, चालणे यांसह अनेक प्रकारचे प्रयोग केले जातात; मात्र अनेकदा यातून वजन कमी न होता नैराश्य येते.

या पार्श्वभूमीवर आहारातून वजन कमी करण्याविषयी प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट नितीन दाढे मार्गदर्शन करणार आहेत. या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे आणि उपाध्यक्ष डॉ. तोरल शिंदे यांनी केले आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
रविवार, १० जून २०१८
वेळ : सायंकाळी चार ते पाच  
स्थळ : महिला मंडळ सभागृह, मारुती मंदिर, रत्नागिरी.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZVQBP
Similar Posts
पहिल्या सायकल रॅलीला रत्नागिरीकरांचा उत्तम प्रतिसाद रत्नागिरी : आरोग्यवर्धक आणि इंधनाची बचत करणारा पर्याय म्हणून रत्नागिरी शहरात सात ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या सायकल रॅलीला उत्तम प्रतिसाद मिळाला. सुमारे तीनशे विद्यार्थी आणि १०० नागरिकांनी आयटीआय/शिवाजीनगर ते हातखंबा आणि पुन्हा शिवाजीनगर अशा २० किलोमीटर अंतराच्या रॅलीत सहभाग घेतला. रत्नागिरी
रत्नागिरीत एक डिसेंबरला वंध्यत्वासंदर्भात मोफत तपासणी शिबिर रत्नागिरी : रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी अँड रिसर्च सेंटरच्या वतीने एक डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत धन्वंतरी रुग्णालयात वंध्यत्व निवारणासंदर्भात मार्गदर्शन व मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
रत्नागिरीतील मॅरेथॉनला चांगला प्रतिसाद रत्नागिरी : आयएमए अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशन आणि वीरश्री चॅरिटेबल ट्रस्ट यांनी रविवारी, १८ नोव्हेंबर २०१८ रोजी रत्नागिरीत आयोजित केलेल्या मिनी मॅरेथॉन आणि मॅरेथॉन स्पर्धांना रत्नागिरीकरांनी चांगला प्रतिसाद दिला. सहा वर्षांपासून ५० वर्षापर्यंत वयाच्या अनेक नागरिकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला.
‘ग्लास पेंटिंग’च्या कार्यशाळेला प्रतिसाद रत्नागिरी : वीरश्री ट्रस्टतर्फे मोफत ‘ग्लास पेंटिंग’ प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी येथील  महिला मंडळ सभागृहात ही कार्यशाळा पार पडली. संस्थेच्या वतीने मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी  वेगवेगळ्या कार्यशाळा दर महिन्याला घेतल्या जातात. रविवार ४ जून रोजी ‘ग्लास पेंटिंग’ची कार्यशाळा घेण्यात आली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language